पुणे

महावितरण च्या प्रीपेड व स्मार्ट मीटर वरून वीज कर्मचारी व ग्राहकांमध्ये वादावादी


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

महावितरण च्या प्रीपेड स्मार्ट मीटर वरून वीज कर्मचारी व ग्राहकांमध्ये वादावादी

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक पुरंदर तालुक्यात सध्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे, हे काम ठेकेदारी पद्धतीने देण्यात आले आहे, हे कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन ग्राहकाला न विचारता मीटर बदली करून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवत आहेत,

ग्राहकांनी याला हरकत घेतल्यास सदर कर्मचारी त्यांच्याशी वाद घालत आहेत. मीटर बसवण्यासाठीचे असल्याचे सांगत आहेत, एकंदरीतच ग्रामीण भागात ग्राहक आणि स्मार्ट मीटर बसवणारे कर्मचारी यांच्यात खटके उडू लागले आहेत. याबाबत महावितरणच्या सासवड विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणे बंधनकारक नाही,

ग्राहकांची इच्छा नसेल तर त्यांनी लिखित तक्रार जवळच्या महावितरणच्या कार्यालयांमध्ये द्यावी, तसेच मीटर बसवण्यासाठी संबंधित कर्मचारी आग्रह करत असेल, तर त्यांच्या नावेही लेखी तक्रार द्यावी. संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.

असेही गणेश चांदणे यांनी सांगितले. याबाबत ग्राहक जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा कॉल सेंटर (19 12) शी संपर्क साधू शकतात. तसेच तक्रार नोंदवू शकतात, राज्य विद्युत नियामक प्राधिकरणाकडे देखील ग्राहक तक्रार देऊ शकतात.


Translate »
error: Content is protected !!