पुरंदर तालुक्यातील चांबळीच्या उपसरपंच पदी सौ स्वाती कामठे यांची बिनविरोध निवड
मुख्य संपादक हनुमंत वाबळे सह्याद्री माझा::
पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या उपसरपंचपदी स्वाती कामठे यांची बिनविरोध निवड
सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक
पुरंदर तालुक्यातील चांबळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी असलेल्या ज्योती सागर कामठे यांचा कार्येकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागी निवडणुक होऊन, स्वाती राजेंद्र कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा सरपंच व निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ विठ्ठल कामठे यांनी जाहीर केली.
या वेळी ज्योती कामठे, संजय कामठे, मनीषा कामठे, प्रतिभा कदम, मारुती कामठे, ग्रामसेवक राखी ढगारे, बाळासो कामठे, विकास कामठे, कैलास कामठे, शहाजी कामठे, चैत्राली कामठे, सुजाता कामठे, लक्ष्मण कामठे, रेखा कामठे, अनिता पवार आदी उपस्थित होते.
माझ्या उपसरपंच पदाच्या काळात शासनाकडून आलेल्या योजना शेतकरी, महिला सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी सदैव गावातील पदाधिकारी याना सहमतीत घेऊन काम करणार आहे असे नुतन उपसरपंच स्वाती कामठे यांनी प्रतिनिधी ला माहिती दिली.






