सासवडमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्षादिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
सासवडमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त वृक्षारोपण
सासवड प्रतिनिधी :(बापू मुळीक) महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त “एक पेड माँ के नाम” या विशेष कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. ४) सासवड (ता. पुरंदर) येथील निरा बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे हरित पर्यावरणाचा संदेश दिला गेला
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप आणि पुरंदरच्या सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक डॉ. यशवंती मेश्राम यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरंदर विभाग आणि पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
याप्रसंगी पुरंदर तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष पोपटराव जगताप, लेखाधिकारी पुरंदर श्रेयस कुलकर्णी, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे, वसुली अधिकारी किरण जाधव, पुरंदर नागरीचे संचालक आनंदराव घोरपडे, व्यवस्थापक सतीश शिंदे, हरीभाऊ शिंदे, अॅड. किशोर म्हस्के, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन महाजन, चंद्रकांत बोरकर, अनिल गद्रे, उर्मिला मदने, अमरीन बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटोओळ: सासवड (ता.पुरंदर) : “एक पेड माँ के नाम” या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करताना माजी आमदार संजय जगताप व डॉ. यशवंती मेश्राम.






