पुणे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये आरोग्यदूत राजेंद्र गिरमे यांच्या पत्नी सोनाली राजेंद्र गिरमे यांनी केला मोफत पाणीपुरवठा सुरु


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवड प्रतिनिधी समीर भिंगारदिवे :
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा; राजेंद्र गिरमे मित्र परिवाराचा उपक्रम

सासवड : सध्या सर्वत्र जाणवत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे व सोनाली राजेंद्र गिरमे मित्र परिवाराच्या वतीने सासवड शहरात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले राजेंद्र गिरमे यांनी यापूर्वीही विविध लोकहिताचे उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात सासवड शहरात सॅनिटायझर फवारणी, विविध भागांत वृक्षारोपण, गरजूंना अन्नदान तसेच वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम अशा अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

याच सामाजिक बांधिलकीतून दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे सासवड शहरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून केलेल्या या कार्याबद्दल राजेंद्र गिरमे व त्यांच्या मित्र परिवाराचे कौतुक होत आहे.

दुष्काळाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!