काळदरीतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
मुख्य संपादक हनुमंत वाबळे:
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक:
काळदरीतील विद्यार्थांना रोटरी क्लबकडून शैक्षणिक साहित्य वाटप
सासवड प्रतिनिधी:(बापू मुळीक)ता. ४ : सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काळदरी येथील श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे अध्यक्ष अभिजीत बारवकर, सचिव ऍड. आनंद जगताप, खजिनदार प्रमोद धनावडे, संचालक जीवन कड, विश्वनाथ गायकवाड विद्यालयाचे प्राचार्य विजय चिकणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती आणि संस्थेचे संस्थापक चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रा. संतोष नवले यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक विजय चिकणे यांनी आपल्या मनोगतातून चंदूकाका जगताप यांच्या शैक्षणिक कार्याची आणि त्यांच्या योगदानाची माहिती दिली. अभिजीत बारवकर आणि प्रमोद धनावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सहशिक्षिक पांडूरंग दुर्गाडे, सुनील घोडके, शिवाजी गोडसे, बाळासो पोमणे, पांडुरंग जाधव, अशोक भगत यांनी नियोजन केले.






