ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

शिवरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रशांत(समीर) कामथे यांची बिनविरोध निवड


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
शिवरी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रशांत कामथे बिनविरोध

: शिवरी (ता. पुरंदर) येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत बुधाजी कामथे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था

श्रीकांत श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिव सविता पवार यांनी काम पाहिले.

येथील सोसायटीचे चेअरमन धनंजय कामथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी निर्धारित कालावधीमध्ये प्रशांत कामथे यांचा

एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. यावेळी सहाय्यक सचिव म्हणून खळद विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव संतोष राऊत काम पाहिले.
निवडप्रक्रियेत सोसायटीचे संचालक माजी अध्यक्ष धनंजय कामथे,ज्ञानेश्वर कामथे,उपाध्यक्ष अनंता लिंबोरे, विठ्ठल कामथे, संजय लिंबोरे ,प्रवीण लिंबोरे, विनोद कामथे , पांडुरंग शिवकर,उत्तम जगताप,महेंद्र खोमणे, चित्रा कामथे,सुनंदा कामथे

यांनी सहभाग घेतला.तसेच सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी श्री अनिल भानुदास कामथे , श्री यशवंत मुगुट कामथे , श्री बाळासाहेब बाबासाहेब खोमणे यांची निवड करण्यात आली

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा येथील पालखी विसावा सभा मंडपामध्ये ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच प्रमोद जगताप, यमाई माता देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आत्मारामभाऊ कामथे ,यमाई माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष

नवनाथ कामथे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर कामथे,माजी सरपंच बाळासाहेब लिंभोरे,अनिल कामथे,भाऊसाहेब कामथे,प्रविण कामथे,नवनाथ गायकवाड,लहू कामथे, अजित कामथे,विशाल कामथे,अंकुश कामथे, सचिन जगताप, सतिश लिंभोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रशांत कामथे यांनी या पदावर काम करत असताना सर्व सभासदांना बरोबर घेऊन जात शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, व्यवसायाच्या माध्यमातून सोसायटीचे उत्पन्न वाढवणे व सभासदांना जास्तीत जास्त

लाभांश मिळवून देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर धनंजय कामथे यांनी सोसायटीच्या नावामध्ये यमाई माता विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असा बदल करण्याची विनंती

केली.मागील वर्षी संस्थेला योग्य काम व अचूक नियोजन केल्यामुळे 7लाख 96हजार 909 रुपये नफा झाला. त्यामुळे संस्थेने मागील वर्षी 10% लाभांश वाटप करण्यात आला. अशी माहिती संस्थेचे चेअरमन धनंजय हरिभाऊ कामथे यांनी दिली


Translate »
error: Content is protected !!