पुणे

श्री चतुर्मुख – भैरवनाथ प्रसादिक दिंडी सोहळा एक सामाजिक उपक्रमाची नांदी-वारीच्या वाटेवर संतोषराजे दळवी


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

श्री चतुर्मुख- भैरवनाथ प्रासादिक दिंडी सोहळा भिवरी एक सामाजिक उपक्रमाची नांदी-
वारीच्या वाटेवर संतोषराजे दळवी.

सासवड प्रतिनिधी: आषाढी पायी वारी सोहळ्यात गावातील शेकडोंच्या पेक्षा जास्त वारकरी विविध संताच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या दिंडीत विखुरले गेले होते. समस्त गावकरी भिवरीकरांनी चंग बांधून श्री चतुर्मुख- भैरवनाथ दिंडीची स्थापना २०१२ मध्ये केली आणि संत श्री सोपानकाका पालखी सोहळ्यात रथामागे शेवटच्या नंबर ला सहभागी झाली.

वारीत देवस्थानच्या विश्वस्तांनी बनवलेल्या नियमावलीनुसार अचूक प्रतिसाद देत अल्पावधीतच दिंडी ने प्रगती करत रथाच्या पुढे तेराव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले.

निर्मल वारी,विसावा आणि मुक्कामी ठिकाणी स्वच्छता,वृक्षारोपण,बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान जनजागृती,समाजप्रबोधन, नवोदित कलाकारांना मृदंगवादन,गायन,आणि प्रवचनकाराचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत आहे.

गावामध्ये दुफळी नसुन गेली अनेक वर्षे गावात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक होत असते,हाच संस्कार वारी सोहळ्यात टिकवून पंढरपूर मध्ये दिंडीसाठी एकोप्याने सात गुंठे जागा खरेदी केली आहे.
अनेक कैलासवासी आणि हयात वारकरी आणि ग्रामस्थ आणि प्रचंड मेहनत घेऊन शंभर सव्वाशे वारकरी घेऊन उभा केलेला दिंडी सोहळा आज चारशे पाचशे महिला पुरुष वारकरी घेऊन सोपानकाका पालखी सोहळ्यात एक छोटे प्रतिनिधित्व करतोय.याचा अभिमान सर्व गावकऱ्यांनी बाळगला असुन .अवघ्या पुणे जिल्ह्या बरोबर सासवड ते पंढरपूर पर्यंत कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Translate »
error: Content is protected !!