शैक्षणिक

एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल सासवड चा पालखी सोहळा संपन्न


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवडचा पालखी सोहळा —

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक — आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेतील विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आज प्रशालेच्या मुख्य सभागृहात उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे वेदमूर्ती मंगेश बावीकर गुरुजी, मधुरा बावीकर, सासवड पत्रकार संघाचे खजिनदार हेमंत ताकवले,

सदस्य जगदीश शिंदे व प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर – नागनूर यांच्या हस्ते पालखी व बाल पांडुरंग रुक्मिणी व संत यांचे पूजन करण्यात आले. यावेळी भक्तीमय वातावरणात छोट्या गटापासून ते नववीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी तालासुरात अभंग,भजन गायन केले.

अश्विनी खळदकर यांनी आपल्या प्रास्ताविकात पालखी सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. तर प्रमुख पाहुणे वेदमूर्ती मंगेश बावीकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थ्यांना छोट्या- छोट्या उदाहरणातून जीवनमूल्य सांगितले.

मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांनी विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया डगळे व पूनम दामोदर तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. रेश्मा जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय भाऊसाहेब येळे यांनी करून दिला.अंकिता कुंजीर यांच्या आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Translate »
error: Content is protected !!