राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुरंदर खजिनदारपदी सौरभ कुंजीर यांची निवड


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या खजिनदारपदी सौरभ कुंजीर यांची निवड

सासवड प्रतिनिधी बापू मुळीक : वाघापूर (ता. पुरंदर) गावचे माजी उपसरपंच सौरभ शेखर कुंजीर यांची पुरंदर तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खजिनदार पदी निवड करण्यात आली, निवडीचे पत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सासवड( ता. पुरंदर) येथील पक्ष कार्यालयांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. सौरभ कुंजीर हे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष असून, पुणे विशाल नागरी सहकारी पतसंस्था मार्केटयार्ड येथे चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत.


Translate »
error: Content is protected !!