21 जून 2025 रोजी अकरावा जागतिक योग दिन म. ए. सो इंग्लिश मीडियम स्कूल व रेड क्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न
सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा बापू मुळीक;;
21 जून 2025 रोजी अकरावा जागतिक योग दिन म. ए.सो इंग्लिश मीडियम स्कूल सासवड व रेड क्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला
सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या व संस्थापकांच्या प्रतिमापूजनाने झाली. निलेश शिंदे व अश्विनी खळदकर यांनी अग्निहोत्र चे महत्त्व व प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सरोज मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म. ए.सो वाघिरे विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक श्रीकांत देशपांडे यांनी त विद्यार्थ्यांना योग महत्त्व व मन, मनगट, मेंदू सक्षम होण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे हे मार्गदर्शनातून पटून दिले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका व योग तज्ञ कल्पना खांडेकर-नागनूर यांनी मौन अभ्यास व आरोग्य यामध्ये विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीरासाठी नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याकडे लक्ष देताना आहाराकडेही लक्ष द्यावे असा संदेश दिला.
प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, प्राणायाम , योगासने यांची प्रात्यक्षिके सादर केली. यासाठी स्वाती पांढरे, निकिता होले, रुचिरा गार्डी प्रतीक्षा बोळगे, भाऊसो येळे , गीता पुरंदरे व क्रीडा शिक्षक नितीन ठोंबरे तसेच प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसो येळे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय निकिता होले यांनी करून दिला व सौ रुचिरा गार्डी यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.






