शैक्षणिक

पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

सासवड प्रतिनिधी:(बापू मुळीक) – पुरंदर तालुक्यातील काळदरी येथील श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या दोनशे विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते सुनिल भानुशाली व मित्रपरिवार यांच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले, हा उपक्रम मुख्याध्यापक विजय चिकणे व पर्यवेक्षक पांडुरंग दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

विद्यालयात वाड्यावस्त्यावरील विद्यार्थी दररोज दोन ते पाच किलोमीटर अंतराहून पायी येतात, पावसात येताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ही मदत उपयुक्त ठरणार आहे असे भानुशाली यांनी सांगितले. कार्यक्रमात प्राध्यापक संतोष नवले,

सुनील घोडके, संजय भिंताडे, शिवाजी गोडसे, सुनंदा टकले, कविता शेलार, पांडुरंग जाधव, अशोक भगत, संतोष दोडके यांचा सहभाग होता. पांडुरंग दुर्गाडे यांनी स्वागत केले, तर बाळू पोमण यांनी आभार मानले.


Translate »
error: Content is protected !!