न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन तसेच शाळेच्या शंभर टक्के निकालाबद्दल माजी आमदार संजय जगताप यांच्याकडून ट्रॉफी प्रदान
पुरंदर प्रतिनिधी – सह्याद्री माझा नवनाथ राणे::
न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन तसेच शाळेच्या शंभर टक्के निकालाबद्दल माजी आमदार संजय जगताप यांच्याकडून ट्रॉफी प्रधान
न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत दिनांक 16/6/2025 वार सोमवार या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन या विद्यालयांमध्ये इयत्ता 5 वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारात ढोललेझीम पथकाने वाजत गाजत नवीन विध्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यालयाचा निकाल 100% लागल्यामुळे मा आमदार संजयजी जगताप सर यांच्याकडून कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब राणे( तात्या ) यांच्या हस्ते मुख्याध्यापक निगडे सर यांना ट्रॉफी देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष जवळार्जुनचे मा. सरपंच अण्णासाहेब राणे शिवसेना शाखा प्रमुख जनार्दन टेकवडे प्र. बागायतदार बापूसो राणे, सा. कार्यकर्ते सयाजी राणे, राहुल टेकवडे, बाळासो टेकवडे, दत्तात्रय टेकवडे, अर्चना टेकवडे,
विद्यालयाचे मुख्याध्यापक निगडे सर सहशिक्षक गायकवाड सर व त्यांचे सर्व सहकारी व पत्रकार नवनाथ राणे यांच्या हस्ते मुलांना पुस्तके वाटप व गुलाब पुष्प देण्यात आले. गेट पासून विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. समीक्षा राहुल टेकवडे इयत्ता 6 वी या विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. व तिच्या पालकांनी विद्यालयास देणगी दिली. सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले.






