उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न
बारामती प्रतिनिधी दीपकनाना वाबळे::
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत भव्य रक्तदान शिबिर – २७१२ बॅग संकलन
बारामती – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त अजितदादा युथ फाउंडेशन बारामतीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर होत्या. तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा सौ. निर्मला नवले, बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष श्री. राजवर्धन शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
अक्षय ब्लड बँक, बारामती यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तब्बल २७१२ बॅग रक्तदानाचे संकलन करण्यात आले असल्याची माहिती अजितदादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सोमनाथ गायकवाड यांनी दिली.
याप्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता माने, उपाध्यक्ष राहुल चौधरी, सचिव सचिन घाडगे, खजिनदार अरविंद काळे यांसह मान्यवर व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






