मृगाचे पाणी चार खंडात पडेल श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा वीर भाकणुकीस प्रारंभ
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा:
श्रीक्षेत्र वीर गावात श्रीनाथांच्या अमृतवाणीने यात्रा उत्सवातील पारंपारिक भविष्यवाणी (भाकणूक) विधी संपन्न
श्रीक्षेत्र वीर येथील यात्रेत भाविकांचा प्रचंड उत्साह अनुभवास येत आहे. गुलालखोबऱ्याची उधळण करीत संपूर्ण मंदिर परिसर नाथांच्या जयघोषात न्हाऊन गेला होता.श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर
यांचेमार्फत अतिशय उत्तम पद्धतीने यात्रा नियोजन व व्यवस्थापन चालू आहे.
आज पंचमी सोमवार दि. १७/०२/२०२५ रोजी पहाटे स. ४ वाजता देवाची पूजा करून देवाला पोशाख करण्यात आला. सकाळी ११ वाजता दरवाजा बंद होऊन ११.३० वाजता मंदिर दर्शनासाठी पुन्हा
खुले झाले. मंदिर परिसरात गजेगोपाळ जेवण सुरु झाले. दुपारी १:३०वा. सर्व काठ्या पालख्या देऊळवाड्यात आल्या. आरती होऊन छबिण्याला सुरुवात झाली. यावेळी श्री क्षेत्र वीर, कोडीत, कन्हेरी, वाई, भोंडवेवाडी, सोनवडी, कसबा पुणे, राजेवाडी गावच्या पालख्या देऊळवाड्यात उपस्थित होत्या. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर दुपारी
०२.३० मिनिटांनी देवाचे मानकरी श्री. तात्यासो बुरुंगले यांच्या अंगात संचार येऊन वार्षिक पीकपाणी, भविष्यवाणी (भाकणूक) सांगण्यात आली.एवढ्या मोठ्या यात्रेत भाकनुकीच्या वेळेत शांतता ठेऊन सर्व भाविकांनी भाकणूक ऐकली. भाकणुकीत सांगितल्याप्रमाणे यावर्षी
मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आर्द्रा च्या वाफवर पेरणी होईल , जनतेचे समाधान होईल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल दोन खंडात साधारण राहील, हत्तीचे पाणी चार खंडात जनतेचे समाधान होईल. बाजरी पीक चांगले, उतरा,पूर्वा, चार खंडात पडेल. गाई-
गुरे यांचेमागील रोगराई हटली आहे, मनुष्याच्या मागे साधारण आटापिटा राहील. गादीचा मालक गादिवर येईल अशाप्रकारे भाकणूक झाल्यानंतर दोन सर्व पालख्यासोबत दोन प्रदक्षिणा होऊन काठ्या-पालख्या आपापल्या पालखीतळावर मार्गस्थ झाल्या. यावेळी हजारो भाविक मंदिर उपस्थित होते.
रविवार दि. १६/०२/२०२५ पासूनच श्री क्षेत्र वीर येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानने यावेळी वीर येथील ग्रामस्थ मुलांना “सेवेकरी” नामे बंदोबस्त, ट्राफिक, मंदिरातील कामे करण्यासाठी एकत्र येऊन सहकार्य केले व पुढील यात्रा कालावधीतही सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्व सालकरी, दागीनदार, मानकरी व प्रमुख पालख्या यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात आले आहेत. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टतर्फे व्यवस्थापन करण्यात आले.






