ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुरंदर – जवळार्जुन येथील महिलांना ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा (नवनाथ राणे)
पुरंदर – जवळार्जुन येथील महिलांना ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत जवळार्जुन व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जवळार्जुन मध्ये महिलांना ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जवळजवळ 47

महिलांनी या प्रशिक्षणात भाग घेतला पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत गावातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 3/4/2025 ते 7/4/2025 या कालावधीमध्ये अस्मिता भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जवळा र्जुन सरपंच अजिंक्य टेकवडे

तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी राणे सामाजिक कार्यकर्ते सतीश साळुंखे ग्रामसेवक रूपाली लोणकर ग्रामपंचायत सदस्य शितल साळुंखे संगीता टेकवडे संगीता राणे यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम संपन्न झाला .

मान्यवरांच्या हस्ते महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले यावेळी शिवाजी नॉलेज सिटी संस्थेचे अध्यक्ष पंकज साबळे प्रशिक्षक श्रावणी जगताप यांनी महिलांना मार्गदर्शन केले व चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतीच्या

मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केले व माहिती दिली यावेळी गावातून गणेश पवार प्रमोद राणे पत्रकार नवनाथ राणे इत्यादी मान्यवर व महिलावर्ग कार्यक्रमास उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!