17 मार्च सोमवारी सासवड येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मूक मोर्चाचे आयोजन
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा :::
सोमवारी सासवड येथे बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मूक मोर्चाचे आयोजन,
पुरंदर : बिहार बुध्दगया येथील जगभरातील बौध्द अनुयायांचे श्रध्दास्थान असलेल्या महाबोधी महाविहारांचा ताबा बुद्धं अनुयायांना देण्यात यावा या मागणीसाठी भिक्खू संघाच्या वतीने, सुरु असलेल्या
आंदोलनाला जाहीर पाठींबा देण्यासाठी बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती समर्थन कृती समिती पुरंदर तालुका यांच्या वतीने, सासवड येथे सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ११ – वाजता
मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाबोधी महाविहार मुक्ती कृती समितीच्या वतीने देण्यात आली,
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार १९४९ चा ट्रस्ट कायदा रद्द करण्यात येऊन, महाविहार बुध्द अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भिक्खू संघाच्या वतीने बुध्दगया येथे सुरु असलेल्या
आंदोलनाला जाहीर पाठींबा देण्यासाठी, रमाई आंबेडकर बुध्दविहार अशोक नगर सासवड येथे, पुरंदर तालुक्यातील भिमसैनिक व बुद्धं अनुयायी यांच्या वतीने रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी
ठीक ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सर्व संमतीने वरील निर्णय घेण्यात आला आहे,
मोर्चाची सुरुवात रमाई आंबेडकर बुध्दविहार अशोक नगर सासवड येथून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन करण्यात येणार असून , अशोकनगर ते अमरचौक मुख्य बाजार
पेठेतुन सदर मोर्चा सासवड नगरपरिषद येथील छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते प्रशासकीय इमारत सासवड
पारगाव रोड, असा जाणार असून, प्रशासकीय इमारत येथे मागणीचे निवेदन, पुरंदरचे तहसिलदार मा. विक्रम राजपूत साहेब यांच्या मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती महोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी, व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार
यांना देण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता होईल , असे सर्वानुमते ठरले, यावेळी बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थन कृती समितीचे कार्यकर्ते यांसह अनेक बुध्द अनुयायी उपस्थित होते,
पुरंदर तालुक्यातील तमाम बौध्द अनुयायांनी भिम सैनिक यांनी आपली राजकीय सामाजिक संघटनेची पदे बाजूला ठेवून तथागत
भगवान गौतम बुद्ध यांचे अनुयायी व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भिम सैनिक म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






