पुणे

अखिल भारतीय मराठा महासंघ, पुरंदर तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या सासवडमध्ये संपन्न


पुरंदर प्रतिनिधी;;

🚩 अखिल भारतीय मराठा महासंघ, पुरंदर तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या पार पडली 🚩

सासवड (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघ, पुरंदर तालुका शाखेची कार्यकारिणी बैठक सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथे उत्साहात पार पडली. संघटनेच्या आगामी कार्ययोजनांना दिशा देणारी ही बैठक ठरली.

या बैठकीस तालुका अध्यक्ष शलील महाराज जगताप, युवक अध्यक्ष आकाश ढुमेपाटील, शहर युवक अध्यक्ष अक्षय सुभाष मारणे, राजाभाऊ जगताप, जयेंद्र निकम, विनोद जगताप, सुभाष जेधे, बाबुराव गायकवाड, डॉ. दादासाहेब जगताप तसेच विशाल बारसुडे, अनिकेत हरपळे, विवेक उबाळे आणि मोठ्या संख्येने युवक सहकारी उपस्थित होते.

बैठकस्थळी सर्व पदाधिकारी वेळेआधी उपस्थित राहून संघटनेच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या उपक्रमांची आखणी करण्यात आली.

या बैठकीमुळे संघटनेच्या कामाला आगामी काळात अधिक गती आणि दिशा मिळेल, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


Translate »
error: Content is protected !!