जवळार्जुन मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
उपसंपादक. नवनाथ राणे::
जवळार्जुनमध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी | जवळार्जुन
जवळार्जुन गावात काल (दि. ____) सकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळार्जुन येथील मा. आमदार अशोकराव टेकवडे यांच्या उसाच्या शेतात काम करणाऱ्या कदम या कामगारास बिबट्या दिसल्याची घटना घडली. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ त्याचा व्हिडिओ काढला.
ही माहिती पत्रकार नवनाथ राणे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनरक्षक देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर जाधव व खोमणे यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी व्हिडिओ आणि बिबट्याचे पंजाचे ठसे पाहून बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेनंतर गावकरी भयभीत झाले असून शेतात जाण्यास लोक घाबरत आहेत. यावेळी सयाजी राणे, संतोष जाधव, हरिभाऊ टेकवडे, कदम व इतर कामगार घटनास्थळी उपस्थित होते.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी आहे की, बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अन्यथा एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. “वनविभागाने ही बाब गांभीर्याने घ्यावी व योग्य ती कार्यवाही तातडीने करावी,” अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.






