ब्रेकिंग न्यूज

चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड च्या भव्य दागिन्यांचा प्रदर्शनाचा दुसरा दिवस 11 ऑगस्ट पर्यंत खुले राहणार प्रदर्शन


मुख्य संपादक सह्याद्री माझा::

चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य दागिन्यांच्या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

सासवड – चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भव्य सोने व हिरे दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात जयदीप मंगल कार्यालय येथे पार पडले. हे प्रदर्शन 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान ग्राहकांसाठी खुले असणार आहे.

उद्घाटन सोहळा पुरंदर-हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा सरचिटणीस विजय कोलते, ज्येष्ठ नेते बबनभाऊ टकले, बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, उभाटा गटाचे अध्यक्ष अभिजीत जगताप, शिवसेनेचे हरिभाऊ लोळे, चित्रपट निर्माते संदीप इनामके, बिल्डर महावीर चोरडिया, सुरेश देसर्डा, तसेच महिला नेत्या नीताताई सुभागडे, प्रीती जगताप, पुजाताई भिंताडे, वर्षा जगताप, कुमोदिनी पांढरे, आरती सुभागडे, अंजली टिळेकर आदींचा समावेश होता.

चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर कुमार राठोड, मॅनेजर ओंकार तिवारी, असिस्टंट मॅनेजर तेजस कामठे, सुपरवायझर अपेक्षा खंडाळे, अमोल माने, अमोल नागुलपेल्ली हे सर्व आयोजक म्हणून कार्यरत होते.

अमोल माने यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत केले, तर कुमार राठोड यांनी आभार मानले.
ग्राहकांसाठी हे प्रदर्शन 8 ते 11 ऑगस्ट 2025 पर्यंत खुले असून, दागिन्यांच्या या भव्य प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कुमार राठोड यांनी केले.


Translate »
error: Content is protected !!