ब्रेकिंग न्यूज

भरधाव फॉर्च्यूनरची दुचाकीला पाठीमागून धडक, युवक गंभीर जखमी, चालक गाडीसह फरार :


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
भरधाव फॉरच्यूनरची दुचाकीला पाठीमागून धडक; युवक गंभीर जखमी, चालक फरार

सासवड (प्रतिनिधी): पुरंदर तालुक्यातील दुमेवाडी हद्दीत पुणे–सासवड मार्गावरील साई अँग्रो हायटेक नर्सरीसमोर भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपे खुर्द येथील ओंकार विकास जगताप (वय २२) हे २१ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या एमएच १२ झेडटी ७८५७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना, एमएच १२ एक्सक्यू २५०९ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या फॉरच्यूनरच्या अज्ञात चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात ओंकार जगताप गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.

या प्रकरणी ऋषीकेश विकास जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा क्रमांक ३४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अभिजित कांबळे करीत आहेत.


Translate »
error: Content is protected !!