महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या उत्सव भक्ती भावाने संपन्न
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचा उत्सव भक्ती भावाने सासवड प्रतिनिधी: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचा उत्सव भक्ती भावाने साजरा करण्यात आला. बाल वारकऱ्यांची भक्तीमय वारी, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीचा देखावा हुबेहूब केला होता.
पारंपरिक वेशभूषा, झांजा, टाळ, लोटागण घेऊन त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची पालखी मिरवली. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरणाने भरून गेला होता. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांचे रूप साकारले. रंगीत पोशाख, मुखवटे आणि सजावटीमुळे शाळेचे अंगण नाट्य रूप रंगभूमीत रूपांतरित झाले.
हा उपक्रम केवळ असं न साजरा करता तर मुलांच्या मनात संस्कृती आणि श्रद्धेची बीज रोवणारा ठरला. असे मुख्याध्यापिका मेघा जांभळे यांनी सांगितले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना लहान वयातच महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाची ओळख करून, देणारा आहे. शाळेने पुढील काळात असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार यापुढे केलेला आहेच.






