महाराष्ट्र

जवळार्जुन फाटा ते जवळार्जुन गाव रस्त्यावर खड्ड्यांची कुरण; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी


उपसंपादक नवनाथ राणे सह्याद्री माझा::

जवळार्जुन फाटा ते गाव रस्त्यावर खड्ड्यांची कुरण; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

जवळार्जुन (ता. पुरंदर) – जवळार्जुन फाटा ते जवळार्जुन गावापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. रस्त्यावर इतके खड्डे आहेत की कोणता खड्डा चुकवावा आणि कोणता घ्यावा, हेच वाहनचालकांना समजेनासे झाले आहे.

या रस्त्याचा वापर दररोज शेकडो गावकरी, विद्यार्थी, महिला आणि दुचाकीस्वार करत असतात. परंतु सध्या रस्त्याची अवस्था इतकी खराब झालेली आहे की वाहन चालवताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागतो. विशेषतः दुचाकीस्वारांचे अपघात वाढले असून अनेकांना किरकोळ जखमा व अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेली दोन वर्षे हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे, तरीही संबंधित विभाग किंवा ग्रामपंचायतीकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थ व वाहनचालकांची मागणी आहे की,संबंधित पीडब्ल्यूडी विभागाने किंवा ग्रामपंचायतीने तातडीने पुढाकार घ्यावा,
सद्यस्थितीत तरी खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा,
तसेच नवीन रस्त्याचे काम मंजूर करून घेण्यासाठी पुढाऱ्यांनी लक्ष घालावे.

रोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचे जीवितधोक्यात आले आहे. याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी रास्ता रोकोसारख्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
“रस्त्यावरून चालणे म्हणजे धोक्याची टांगती तलवार आहे. प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता असते.” — स्थानिक रहिवासी


Translate »
error: Content is protected !!