ब्रेकिंग न्यूज

पारगाव सासवड रोडवरील राठी फार्महाउस च्या पुढील तयार होत असलेल्या पुलावर दुर्दैवी अपघातात युवक ठार; शासन अजून किती बळी घेणार ?


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
उपसंपादक नवनाथ राणे::

पारगाव सासवड रोड वरील राठी फार्म हाऊस च्या पुढील तयार होत असलेल्या पुलावर दुर्दैवी अपघातात युवक ठार

जेजुरी (ता. पुरंदर) : दि. 24 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राठी फार्म शेजारील रस्त्यावर दुर्दैवी अपघात घडून आला. या अपघातात रियाजअलम नजीबउल्ला शेख (वय 24 वर्षे, रा. काष्टी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाजअलम हा पारगाव मेमाणे येथे वेल्डिंगचे काम करत होता. दि. 24 जुलै रोजी सकाळी तो मोटारसायकल (क्र. ए.पी 29 एच 7418) वरून पारगावहून सासवडकडे जात असताना राठी फार्म शेजारी नवीन पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या नळ्याजवळील पाण्यात मोटारसायकलसह पडला. यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती त्याचा भाऊ सिराजअलम नजीबउल्ला शेख यास रियाजअलमच्या मित्रामार्फत मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अॅम्ब्युलन्स दाखल झाली. ग्रामस्थांच्या मदतीने रियाजअलमला तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची रुजु नोंद क्र. 09/2025 जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार कदम (पो.ह.वा./1839) करीत आहेत.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षितता राखण्यात आलेली नव्हती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


Translate »
error: Content is protected !!