राजमाता महिला कबड्डी संघातर्फे श्रावण विशेष स्नेहमेळावा संपन्न
राजमाता महिला कबड्डी संघातर्फे श्रावण विशेष स्नेहमेळावा
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात राजमाता महिला कबड्डी संघ तर्फे सत्यनारायण महापूजा व गेट-टुगेदरचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी निवडक माजी खेळाडूंना निमंत्रित करण्यात आले होते.
निमंत्रण स्वीकारून नाशिक येथील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. संतोष झगडे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी महिला खेळाडूंना मार्गदर्शन करून स्नेहमेळाव्याला द्विगुणित आनंद दिला.
या संघाचे संस्थापक व व्यवस्थापक राजेंद्र ढमढेरे असून त्यांना वारघडे सर सहकार्य करतात. संघामार्फत आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच विद्यापीठस्तरीय खेळाडू घडले आहेत. यातील अनेक खेळाडूंना क्लास-वन, क्लास-टू अधिकारी तसेच विविध बँकांमध्ये नोकरी मिळाल्याने संघाचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
सदर माहिती राष्ट्रीय खेळाडू व राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथील निवृत्त निरीक्षक तानाजी शिंदे यांनी दिली.






