पुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नी ठार
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
पुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नी ठार झाले आहेत
याबाबत
फिर्यादी – अमित गणपत यादव वय 39 वर्षे व्यवसाय पोलीस पाटील रा. यादववाडी ता. पुरंदर जि. पुणे त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दि.16/08/2025 रोजी सायंकाळी 6/10 वा. चे सुमारास यादववाडी ता. पुरंदर जि. पुणे गावचे हददीत आमचे फार्महाऊस नावाचे हॉटेलचे पुढे परिंचे बाजुस 100 मीटर अंतरावर सासवड विर रोडवर माझे चुलते आनंदराव रामचंद्र यादव वय 77 वर्षे,
चुलती शिंधुमती आनंदराव यादव वय 65 वर्षे रा. यादववाडी ता. पुरंदर जि. जि. पुणे हे शेतातुन घरी पायी चालत जात असताना बापुराव जगताप रा. माहुर ता. पुरंदर जि.पुणे याने त्याचे ताब्यातील इको कार नं. एम.एच. 12 एल. पी. 6571 ही रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, निष्काळजीपने,
भरधाव वेगात चालवित येवुन पाठीमागुन ठोस देवुन अपघात करून अपघातात माझे चुलतें आनंदराव रामचंद्र यादव वय 77 वर्षे, चुलती शिंधुमती आनंदराव यादव वय 65 वर्षेयांना गंभिर व किरकोळ दुखापती होवुन त्यांचे मृत्युस कारनिभुत झाला आहे पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.स.ई पालवे करीत आहेत






