सोनोरी – श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी चैत्री यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्तीचा आखाडा संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :::
नाद कुस्तीचा वारसा परंपरा जपण्याचा
श्री भैरवनाथ जोगेश्वरी चैत्री यात्रेनिमित्त सोनोरी गावात विविध कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये देवाची पूजा अर्चा अभिषेक, छबीने, सोनोरी गावचे माजी सरपंच बाळासाहेब (नाना) मल्हारी काळे मित्रपरिवार
आणि समस्त ग्रामस्थ सोनोरी यांच्या प्रयत्नातून भव्य निकाली कुस्त्यांचा आखाडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी आखाड्याचे पूजन सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य वस्ताद मंडळी ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते पार पडले, या आखाड्यात आकर्षण म्हणून काळे
पाटील परिवाराच्यावतीने श्री बाळासाहेब उर्फ नाना काळे यांच्या तर्फे मानाची चांदीची गदा, तसेच पाच फुटी ढाल सौजन्य विठ्ठल काळे, कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे तसेच जालिंदर काळे, डोक्याने नारळ फोडणारे संभा पाटील कोल्हापूर, हलगी वादक अंबाजी लिंबाजी हलगी
ग्रुप मोरवे समस्त ग्रामस्थ सोनोरी, विविध आखाड्याचे वस्ताद, अनेक महाराष्ट्रातील नामांकित मल्ल या भव्य निकाली कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये उपस्थित होते, अकराशे रुपयांपासून ते एक लाखापर्यंत जवळपास निकाली 35 कुस्त्या लावण्यात आल्या,
याचबरोबर ग्रामस्थांच्या वर्गणीतून ऐच्छिक कुस्त्या सुद्धा लावण्यात आल्या,
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब नाना काळे यांच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते, एक लाखाच्या कुस्तीमध्ये महारुद्र काळेल, 75 हजाराच्या कुस्तीमध्ये तुषार दुवे, विजयी झाले






