क्रीडा

पुरंदरचे सुपुत्र वरदन कोलतेचा सनसनाटी विजय ; दुसऱ्या मनांकित खेळाडूला दिली मात


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुरंदरचे सुपुत्र वरदन कोलतेचा सणसणाटी विजय; दुसऱ्या मानांकित खेळाडूला दिली मात

सासवड : सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरच्या वतीने आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित चौथ्या पुणे जिल्हा मनांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरंदरचे सुपुत्र वरदन कोलते याने सणसणाटी विजय मिळवत आपल्या खेळाची छाप पाडली.

प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित वरदन कोलतेने दुसऱ्या मानांकित सारंग गवळी याचा ११-७, ७-११, ११-७ असा सनसनाटी पराभव केला.

या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहन उसगावकर, सिम्बॉयसिसच्या वित्तीय विभागाचे सुनील जैन, मुख्य पंच मधुकर लोणारे आदी उपस्थित होते.

वरदन कोलते हा पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावचे रहिवासी तानाजी कोलते यांचा नातू असून, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय कोलते यांचाही नातू आहे. वरदन ने मिळवलेल्या या विशेष यशाबद्दल पुरंदर तालुक्यातील विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Translate »
error: Content is protected !!