शैक्षणिक

जवळार्जुन येथे मुख्याध्यापक उत्तमराव निगडे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ सोहळा उत्साहात संपन्न


उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे :
जवळार्जुन येथे मुख्याध्यापक उत्तमराव निगडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

जवळार्जुन (प्रतिनिधी) – न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुनचे मुख्याध्यापक उत्तमराव निगडे सर यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव समारंभ माननीय आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

पुरंदर तालुक्यातील काळदरीसारख्या दुर्गम भागातून सेवेला सुरुवात केलेल्या निगडे सरांनी तब्बल ३४ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यापैकी २६ वर्षे त्यांनी जवळार्जुन गावात सेवा बजावली. स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या सूचनेनुसार अत्यंत गरजू व अवघड परिस्थिती असलेल्या या गावात त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

त्या काळात शाळेची इमारत नव्हती, विद्यार्थी संख्या अत्यल्प होती. मात्र निगडे सरांनी ग्रामस्थांना सोबत घेत अथक परिश्रमातून गावात भव्य शाळा उभी केली, विद्यार्थी संख्या वाढवली आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण केली. स्वच्छता, शिस्त, टापटीपपणा, प्रशासनावर पकड, पालकांशी सतत संवाद आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेम व अनुशासन या गुणांमुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव गवळी सर होते. प्रमुख उपस्थितांमध्ये मा. आमदार अशोक टेकवडे, ज्योतीताई मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, अण्णासाहेब राणे, उत्तमराव शिंदे, सुधाकर टेकवडे, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर सर, तसेच तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, ग्रामस्थ आणि निगडे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते निगडे सरांचा सपत्नीक विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी निगडे सरांच्या कार्याचा गौरव करत, निवृत्तीनंतरही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये त्यांचे मार्गदर्शन कायम लाभत राहील, अशी ग्वाही दिली.

सत्काराला उत्तर देताना निगडे सरांनी शाळा आणि गावाबद्दलचे प्रेम कायम राहील, तसेच वेळोवेळी शाळेला भेट देत मार्गदर्शन करत राहणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले, तर संपूर्ण नियोजन शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.


Translate »
error: Content is protected !!