आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान चे साहित्य, पत्रकारिता ,व कलाकार पुरस्कार जाहीर
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा;;
अत्रे प्रतिष्ठानचे साहित्य,पत्रकारिता व कलाकार पुरस्कार जाहीर.
सासवड प्रतिनिधी:- बापू मुळीक आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान दरवर्षी आचार्य प्र. के.अत्रे यांच्या १३ जून या स्मृतिदिनी “आचार्य अत्रे पुरस्कार” सोहळा कार्यक्रम घेत असते. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद,
सासवड शाखा यांच्या संयुक्त सहकार्याने ५६ वा स्मृतिदिन साजरा, करीत आहे. या दिवशी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या स्मृति रसिकांसमोर सतत राहाव्यात या उद्देशाने आचार्य अत्रे ‘साहित्य’, आचार्य अत्रे ‘पत्रकारिता’ व आचार्य अत्रे ‘कलाकार’ पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे हे ३५ वे वर्ष आहे.
या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा आचार्य अत्रे “साहित्य पुरस्कार” मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. सुरेश कोडीतकर यांना जाहीर झाला आहे.आचार्य अत्रे “पत्रकारिता पुरस्कार “पत्रकार” श्री. मंदार गोंजारी यांना तर आचार्य अत्रे “कलाकार पुरस्कार” ज्येष्ठ मराठी नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम १३ जून २०२५ रोजी “डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन” सासवड येथे दुपारी ५ वाजता संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.सा.प.सासवड शाखेचे अध्यक्ष दिलीप निरगुडे यांनी केले आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण,बंडूकाका जगताप, अण्णासाहेब खाडे, वसंतराव ताकवले, रमेश कोतवाल, बाळासो मुळीक, रवींद्र पोमण, रामचंद्र खेडेकर,अशपाक बागवान,कलाताई फडतरे,धनाजी नागणे संस्थेतील मुख्याध्यापिका मुख्याध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.






