ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दुसऱ्यांदा प्रतिक्षा मुळीक चे दुय्यम निबंधक (सब रजिट्रार) पदी नियुक्ती


सह्याद्री माझा प्रतिनिधी:;

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दुसऱ्यांदा प्रतीक्षा मुळीकचे दुय्यम निबंधक (सब रजिस्ट्रार ) पदी नियुक्ती:

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पहिल्या प्रयत्नातून, प्रतीक्षा तुकाराम मुळीक हिची, राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली होती. मुंबई या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर तिने पुढे अभ्यास चालू ठेवत असतानाच, तिला दुसऱ्यांदा यश प्राप्त झाले ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दुय्यम निबंधक (सब रजिस्ट्रार ) म्हणून नियुक्ती

झाली आहे.पिसे या गावातील पहिलीच मुलगी ही परीक्षा पास होऊन नियुक्ती झालेली आहे. दुष्काळी गाव असून, खडतर प्रसंगातून तिने उच्च असे शिखर गाठलेले आहे. तिचे मूळ शिक्षण सासवड नगरपालिकेत झाले आहे, नंतर म.ए.सो. वाघीरे विद्यालयात

सासवड येथे शिक्षण तिने पूर्ण केले. गुरु शिष्यांच्या या संवादामधून चांगले यश तिने मिळवले आहे, आई -वडील यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे, तिने चांगले उत्तुंग यश असे मिळवले आहे. त्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप यांनी भरभरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सासवड( ता. पुरंदर )येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा हॉल, पाण्याच्या टाकीजवळ सोपाननगर सासवड या ठिकाणी सत्कार समारंभात जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मच्छिंद्र कुंभारकर, महेश जगताप, नंदकुमार सागर, इस्माईल सय्यद, कुंडलिक मेमाणे, सुरेश काकडे, अनिल गद्रे, बाळासो मुळीक, राजेंद्र कुंजीर, तानाजी फडतरे, इब्राहिम सय्यद, गणेश मुळीक, शिवाजी राजीवडे यांनी आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त केल्या. विशेष करून, या कार्यक्रमास माधुरी मुळीक,

प्रतिक मुळीक, सीमा मुळीक, पुष्पा मुळीक, युवराज निगडे व सय्यद परिवारातील सदस्य सासवड येथील हजर होते. यावेळी अजित जगताप, संदीप जगताप, आनंद (भैया) जगताप, विस्तार अधिकारी राजेंद्र कुंजीर, केशव काकडे, चंद्रशेखर जगताप, अभिमन्यू जगताप, हनुमंत मेमाणे, बाळासो मेमाणे, तात्यासो खताळ, कुंडलिक शेलार,

पी.एस.आय साळुंके, हरिश्चंद्र गायकवाड, राजेंद्र खेडेकर, दादा मुळीक, विठ्ठल मुळीक, अनंता जाधव , तानाजी फडतरे, सासवड नगरपालिका शिक्षक वृंद, दिलीप पापळ,म्हस्कु कोलते, चंद्रभान गोर्डे, अनिल गुरव, राजेंद्र मुळीक, राजेंद्र बोरकर, पंडित सुतार, सोपाननगर व वाढीव हद्दीतील नागरिक बंधू भगिनी यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक वसंत ताकवले यांनी केले. सूत्रसंचालन रामप्रभू पेटकर यांनी केले ,तर आभार माजी मुख्याध्यापक तुकाराम मुळीक सर यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!