महाराष्ट्र

सासवड शहर भाजपा च्या वतीने डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सासवड नगरपालिकेच्या सफाई कामगारांना रेनकोट वाटप


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::;
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

आज, २४ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता, भारतीय जनता पार्टी सासवड शहराच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त सासवड नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह-संघटक मंत्री दादा वेदक जी, बांधकाम व्यावसायिक क्षितीज जी वेदक,

भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, जयेंद्र निकम, समीर कामत, उदयराज जगताप, मयूर जगताप, राहुल भोंडे, नगरपालिकेचे अधिकारी मोहन चव्हाण यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते.

सासवड शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर, नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्या परिसराची तातडीने स्वच्छता केली. मात्र, पावसामुळे त्यांच्या कामात अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन, भाजपा सासवड शहराच्या वतीने कृतज्ञतेच्या भावनेने सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.


Translate »
error: Content is protected !!