क्राईम न्यूज

सासवड पोलीस स्टेशनची कामगिरी खानापूर हवेली हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक


सासवड पोलीस स्टेशन, जि. पुणे ग्रामीण.

खानापुर, हवेली हदिदतील खुनाच्या गुन्हयातील फरारी असलेला आरोपी जेरबंद’’*

हवेली पोलीस स्टेशन हद्दीत घेरासिंहगड, सांरेवाडी चैक व खानापुर चैक येथे दि.14/09/2024 रोजी रात्री 10ः30 वा. ते दि.15/09/2024 रोजी रात्री 1ः00 वा. च्या

सुमारास 1)चेतन उर्फ दादया चंद्रकांत जावळकर, 2)यष उर्फ माम्या चंद्रकांत जावळकर, 3)प्रवीण दशरथ सांबरे, 4)विकास उर्फ पांडा विलास नारगे, 5)साहिल उर्फ चाॅकलेट बाळु कोडके, 6)मयत-राहित उर्फ भोर्या धर्मेंद्र ढिले, सर्व

रा.खानापुर, ता.हवेली, जि.पुणे. यांनी जुन्या भांडणचे कारणावरून सोमनाथ आनंता वाघ वय. 24 वर्शे, रा.म्हस्कोबा मंदीराजवळ, खानापुर, ता.हवेली, जि.पुणे यास बंदुकिने गोळया घालुन जिवे ठार मारले. बाबत हवेली पो.स्टे. येथे गु.र.नं.211/2024 भारतीय न्याय संहिता

कलम.103(1), 109, 189(2),(4),(9), 191(2),(3), 190, 352, 351(1),(3),(4). भारतीय हत्यार कायदा कलम.3,25 प्रमाणे गुन्हा दाखल असुन आरोपी नं. 1 ते 5 यांना यापुर्वी अटक झालेली होती.

यातील पाहिजे आरोपी श्रीनाथ अशोक बडदे, वय.24 वर्शे, रा.कोडीत बु’ ता.पुरंदर, जि.पुणे हा फरारी होता.
सासवड पोलीस स्टेशनचे

आज दि.04/10/2024 रोजी दुपारी 14:00 वा. पोलीस निरीक्षक ऋशिकेष अधिकारी, पोलीस हवालदार रूपेश भगत, जब्बार सय्यद, गणेश पोटे असे चांबळी, गराडे, कोडीत भागात पेट्रोलींग करीत असतांना श्रीनाथ अशोक बडदे हा चांबळी येथे मिळुन आला असुन त्यास ताब्यात घेतले आहे. नमुद आरोपीस पुढील कारवाईकामी हवेली पो.स्टे. ठाण्याचे पथकाचे ताब्यात देण्यात आलेले असुन अधिक तपास हवेली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे करीत आहेत.

आरोपीवर यापुर्वी खालील गुन्हे दाखल आहे.

1)सासवड पो.स्टे. गु.र.नं.148/2018 भा.दं.वि.का.क.307, भारतीय हत्यार कायदा क.3(25). मुं.पो.का.क.135.
2)सासवड पो.स्टे. गु.र.नं.455/2018 भा.दं.वि.का.क.307,341,143,147,148,149,323,504,506.
3)सासवड पो.स्टे. गु.र.नं.131/2019 भारतीय हत्यार कायदा क.3(25), मुं.पो.का.क.135.


Translate »
error: Content is protected !!