क्राईम न्यूज

गराडे येथे जमिनीच्या वादातून मारहाण, दोघा विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल :


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
गराडे येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

पुरंदर तालुक्यातील गराडे येथे जमिनीच्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. मठवाडी येथील सुजित सुरेश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यात स्वप्नील चंद्रकांत जगदाळे आणि चंद्रकांत रघुनाथ जगदाळे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १७ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गराडे येथील गट क्रमांक १२५३ मधील जमिनीत जेसीबीद्वारे काम सुरू असताना त्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काठी, हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार हाके करत आहेत.


Translate »
error: Content is protected !!