क्राईम न्यूज

पुणे आंबेगाव –वैयमस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून


पुणे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वरअण्णा दळवी::

पुणे – वैयमस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना आंबेगाव मधील जांभूळवाडी येथील धरणाच्या बांधावर घडली, प्रकरणी देगाव पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,रोहित नामदेव ढमाळ (रा योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती , नऱ्हे सिंहगड रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे,

याप्रकरणी सुरज गणेश सूर्यवंशी (गणेश पेठ) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी आंबेगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत,

तर रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय 21 रा प्रतीक हाईट्स, पारी कंपनी जवळ नऱ्हे , सिंहगड रोड) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आंबेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुरज गणेश सूर्यवंशी व मृतक सुरज हे मित्र असून, त्यांच्यात काही कारणास्तव वाद होता, शनिवारी (दि 14) रोजी रात्री साडेदहा वाजता परिसरातील जांभळवाडी तलावाच्या बांधावर सूरज व रोहित यांच्यात वाद झाला, वादातून आरोपी सुरज ने रोहितच्या डोक्यात दगड घातला या घटनेत जखमी रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले,

उपचारा दरम्यान रोहित चा मृत्यू झाला आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपास करण्यास सुरुवात केली आरोपी सुरज सूर्यवंशी फरार झाला असून आंबेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत


Translate »
error: Content is protected !!