सासवडमध्ये 50 हजार रुपयांची लाच घेणारे पी एम आर डी च्या दोन अभियंत्यासोबत एक खाजगी इसम अटकेत
सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा
घरकुलाचे राहिलेले पैसे मिळवण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पीएमआरडीच्या दोन अभियंते एक खाजगी इसमावर कारवाई
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पी.एम. आर. डी. मध्ये कंत्राटी कामकाज करणारे कनिष्ठ अभियंता, इंजिनीअर
व खाजगी इसम यांचेवर लाच मागणी व स्विकारले प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेले माहितीनुसार संशयित आरोपी तेजस संपत तावरे वय ३२ वर्ष, पद कनिष्ठ अभियंता ( हंगामी), हेमंत लालासो वांडेकर, (वय २९, पद इंजिनिअर ( हंगामी)
दोघे नेमणुक पीएमआरडी कार्यालय,आकुर्डी, पिंपरी-चिंचवड, पुणे. रामदास ऊर्फ बाबू मारुती कटके, (वय ४८ वर्ष, रा. भिवरी, ता. पुरंदर) यांनी ५० हजार रुपये स्वीकारलेली लाच रक्कम आहे त्यांच्यावर भ्रष्टाचार
प्रतिबंध अधिनियम सन 1988 च्या कलमान्वये कार्यवाही करण्यात आली असून उद्या त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे असे तपास अधिकारी यांनी सांगितले
तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांच्या नावाने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. सदर योजनेतून तक्रारदार यांना घरकुलाचे २,५०,०००/- रुपये अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी पहिला हप्ता
रुपये एक लाख तक्रारदार यांचे बँक खात्यावर जमा झाला होता व उर्वरित दीड लाख रुपये जमा करण्याचे आमच्या हातात असून, सदर रक्कम तक्रारदार यांचे खात्यावर जमा करण्यासाठी लोकसेवक क्र. २ हेमंत
वांढेकर व खाजगी इसम रामदास कटके यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाले होते त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे
सदरहून ही कारवाई हॉटेल सिद्धेश्वर अमृततुल्य सासवड बस स्टँड समोर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी हा सापळा लावण्यात आला होता यावेळी पी एम आर डी चे दोन अभियंते व एक खाजगी इसम यांना लाच
घेताना रंगेहात पकडण्यात आले, सदरची कारवाई मा पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे लाच प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, मा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शितल जानवे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली
पुणे लास्ट नुचपत प्रतिबंध विभागाने केली व कोणी लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी व त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाच मागत असतील तर तात्काळ लाच प्रतिबंधक विभाग पुणे येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले






