क्राईम न्यूज

सासवडमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, 12 जणांसह चार अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल :


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवडमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; १२ जणांसह चार अनोळखी आरोपींवर गुन्हा

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात १२ नामनिर्देशित आरोपींसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शुभम यल्लापा गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोपानकाका मंदिर ते हाडको रोड परिसरात मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. लोखंडी रॉड, दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतले आणि मदतीसाठी कोणीही पुढे येऊ शकले नाही. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करत आहेत.


Translate »
error: Content is protected !!