ब्लड कॅन्सरने मृत्यू पावलेल्या मुलाला वडिलांची अनोखी श्रद्धांजली शाळेतल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
पुरंदर, जेऊर
मुलाच्या मृत्यू नंतर शालेय मुलांची आरोग्य तपासणी करून वडिलांनी वाहिली मुलाला श्रद्धांजली
ब्लड कॅन्सरने गेलेल्या मुलाच्या वडिलांनी केली शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी
आपल्यासारख दुःख कोणाच्या वाटेला येऊ नये म्हणून काळजी घेण्याच आवाहन
मुलाच्या मृत्यूनंतर पित्याची अनोखी श्रध्दांजली
हे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या आकाश धुमाळ याचा १३ दिवस पूर्वी ब्लड कॅन्सरने मृत्यू झाला होता. दत्तात्रय धुमाळ यांचा हा मुलगा अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी प्रयोगशाळा अहवालात निदान झालेल्या ब्लड कॅन्सर मुळे त्याला पंधरा दिवसात मृत्यू आला आपल्या मुलाच्या रोगाचे वेळेत निदान झालं असतं तर आपण त्याला वाचवू शकलो असतो. मात्र अशा प्रकारच दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून आकाशचे वडील दत्तात्रय धुमाळ यांनी आकाशाच्या तेरावा विधीच्या दिवशी जेऊर येथील विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मिळून २५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.






