क्राईम न्यूज

आस्करवाडी येथील माऊंटन मिस्ट हॉटेलवर हुक्का बार कारवाई ; 61 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे : उपसंपादक प्रा संदीप टिळेकर ::
आस्करवाडी येथील माऊंटन मिस्ट हॉटेलवर हुक्काबार कारवाई; 61,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

आस्करवाडी : आस्करवाडी येथील माऊंटन मिस्ट हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्काबार सुरू असल्याची कारवाई सासवड पोलिसांनी केली. या कारवाईत हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, चिलीम व रबरी पाईप असा एकूण 61 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजता माऊंटन मिस्ट हॉटेलमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरविला जात असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी विनोद प्रल्हाद सुद्रिक (वय 49), आमिन कंगाल चौधरी (वय 19) आणि निषराज गणेशराज देपगोटा (वय 24) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 462/2026 दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान 36 हजार रुपये किमतीचे 9 हुक्का पॉट, 25 हजार रुपये किमतीचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचे 10 डबे, 50 रुपयांची चिलीम आणि 900 रुपये किमतीचे 6 रबरी पाईप, असा एकूण 61,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 चे कलम 4(अ), 21(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पो.हवा. होळकर करीत असून, दाखल अंमलदार म्हणून पो.हवा. सोनवणे यांनी काम पाहिले. सासवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!