जेजुरी मोरगाव रस्त्यावर गणेश मंगल कार्यालयासमोर विक्रम मोहन जगताप यांचा अज्ञात वाहनाने ठोस दिल्यामुळे जागीच मृत्यू
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे ::::
जेजुरी मोरगाव रस्त्यावर अपघात.एका व्यक्तीचा मृत्यू
जेजुरी – दि 27 जेजुरी मोरगाव रस्त्यावर गणेश मंगल कार्यालयासमोर अज्ञात पीकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात विक्रम मोहन जगताप वय 43 रां चोरवाडी ,जवळार्जून ता पुरंदर जी पुणे. यांचा मृत्यू झाला आहे.
या बाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहित अशी की. मंगळवार दिनांक 26 रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास विक्रम जगताप हे दुचाकी गाडी वरून जेजुरीकडे जात असताना अज्ञात
पीकअप वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघात विक्रम जगताप यांच्य डोक्याला गभिर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.






