राष्ट्रीय काँग्रेस पुरंदर तालुक्याच्या महिला उपाध्यक्षपदी सौ मंजुषा गायकवाड यांची निवड
पुरंदर तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सौ.मंजुषा गायकवाड
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या मानस कन्येचा राजकीय प्रवेश
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेणाऱ्या तसेच ममता बाल सदन कुंभारवळण येथील अनाथ आश्रमातील मुलगी माई सिंधूताई सपकाळ यांचा वारसा जपणाऱ्या कुंभारवळणच्या
सरपंच सौ मंजुषा गोपाल गायकवाड यांची पुरंदर तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड पुरंदर तालुका महिला अध्यक्षा सुनीता कोलते यांनी केली असून या निवडीचे पत्र पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
आपण भारतीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विचाराने युवकांसाठी व सर्वसामान्यांसाठी पक्षात कार्य करून पक्ष संघटना शक्तिशाली व बळकट करून नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने काम करून पक्ष संघटनेसाठी वेळ द्यावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तर निवडीनंतर बोलताना मंजुषा गायकवाड म्हणाल्या की, महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणार असून, सरपंच पदाने याची सुरुवात माझ्या गावापासून झाली बचत गटाच्या माध्यमातून काम सुरू केले आणि आज
तालुक्याची जबाबदारी दिली आहे ती मी प्रामुख्याने पार पाडेल, महिलांसाठी घरकुल, संजय गांधी, श्रावण बाळ, इतर अनेक शासकिय योजनेची प्रकरणे गोरगरीब महिलांसाठी संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करणार असून माई सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे.
यावेळी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुनीता कोलते, उज्वला खेनट, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, प्रिया जगताप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे, रितेश जांभुळकर, गोपाल गायकवाड उपस्थित होते.






