राजकीय

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर विधानसभा कार्याध्यक्षपदी हनुमंत वाबळे यांची नियुक्ती


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर विधानसभा कार्याध्यक्षपदी हनुमंत कृष्णा वाबळे यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) पिंपरी चिंचवड शहर विधानसभा कार्याध्यक्षपदी हनुमंत कृष्णा वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना हनुमंत कृष्णा वाबळे यांनी सांगितले की, “पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”

या नियुक्तीबद्दल हनुमंत कृष्णा वाबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Translate »
error: Content is protected !!