ताज्या घडामोडी

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आझाद हिंद महिला संघटनेच्या सर्व रुग्णांना राखी बांधत रक्षाबंधन सोहळा साजरा


प्रतिनिधी सह्याद्री माझा
लाडक्या बहिणींचे औक्षण भावांचे अश्रू अनावर.
मुस्लिम बांधवांनीही बांधली राखी.
वीस वर्षापासून रक्षाबंधनाचे ऋणानुबंध घट्ट..

जिल्हा सामान्य रुग्णालयात आझाद हिंद महिला संघटनेचा सामाजिक उपक्रम.

परिवार आणि लाडक्या बहिणींपासून लांब असलेल्या रुग्णांना सलग एकविसाव्या वर्षीही आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने रक्षाबंधनाचे ऋणानुबंध जोपासले. रक्षाबंधनानिमित्त बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना बहिणींनी औक्षण ओवाळतांना लाडक्या भावांच्या डोळ्यातून अश्रू

अनावर झाले.आरोग्यामुळे परिवारापासून लांब राहावे लागले.त्यामूळे रक्ताचे नाते असलेल्या बहिणींनीही पाठ फिरवली. अशा परिस्थितीत आझाद हिंद महिला संघटनेच्या लाडक्या बहिणींनी केलेले औक्षण आणि रक्षाबंधन लाडक्या भावांना भाऊक करून गेले. रक्षाबंधन कार्यक्रमातून सामाजिक एकात्मतेचे दर्शनही घडले. रुग्ण मुस्लिम

बांधवांनीही स्वंयस्फृतीने पुढाकार घेत रक्षाबंधन केले.
आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना रक्षाबंधनाचा उपक्रम आज राबविण्यात आला. यावेळी 150 लाडक्या रुग्ण भावांना पेढे भरवीत औक्षण ओवाळत रक्षाबंधन केले. यामध्ये आझाद हिंद

महिला संघटनेच्या पदाधिकारी सौ सुरेखाताई निकाळजे, कु.पूनम गायकवाड, सौ.आशाताई गायकवाड, प्रमिलाताई सुशीर, जिजाबाई इंगळे, पंचफुला गवई, शाहीर सिंधुताई आहेर,अलकाताई खांडवे, सुनिताताई जाधव, कासाबाई काळवाघे, मिराबाई ठाकरे आदींनी सहभाग घेतला. यावेळी

जिल्हाशल्यचिकित्सक भागवत भूसारी, आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे, असलम शाह, रविकांत भोंडे, विशाल बोराळे, शेख अफसर, संजय एंडोले तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे परिचारक आर नांदुरेकर, टि गायकवाड, एम नागवे, एस एस खुर्दे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
———–
बुलढाणा
दिनांक: 19/08/2024


Translate »
error: Content is protected !!