राजकीय

1 ऑक्टोबर रोजी रिपाई श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे होणार आंदोलन


१ आक्टोंबर रोजी रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन,

सासवड : भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांचा पुतळा काढून टाकणार्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम नवीन जागेत तात्काळ सुरु

करण्यात यावे,या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने, मंगळवार दि. १ आक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११ – ०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जाहीर निदर्शने आंदोलन

करण्यात येणार आहे . सदर आंदोलन रिपाइंचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड एल टी सावंत साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या

अध्यक्षतेखाली करण्यात येणार असून, या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे राज्य जिल्हा तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप यांनी दिली, याबाबतचे लेखी निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राज्याचे मुख्य सचिव , राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे जिल्हा पोलीस आयुक्त पुणे शहर , ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन यांना दिले आहे,
प्रशासकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुतळा काढून टाकण्यात यावा याबाबतचे लेखी आदेश नसताना देखील, पुरंदरचे प्रांत वर्षा लांडगे मॅडम, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व संबंधित ठेकेदार यांनी संगनमताने कट कारस्थान करुन , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाकला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी अनेकवेळा लेखी निवेदन देऊन व दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी सासवड येथे जाहीर निदर्शने आंदोलन करुन ही, राज्यसरकार किंवा जिल्हा प्रशासन संबंधितावर कारवाई करीत नाहीत, त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत, मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हवेनी कोसळल्यानंतर पुतळा बणविणार्या शिल्पकारास अटक करण्यात येते, सदर प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितावर कारवाई करण्यासाठी समिती गठीत केली जाते, छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागतात, परंतु कोणतेही आदेश नसताना, पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचा विचार न करता, आंबेडकरी जनतेला सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार यांना विश्वासात न घेता, एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे,घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाकतात, त्यांच्यावर कारवाई का? केली जात नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना एक न्याय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दुसरा न्याय हा दुजा भाव राज्यसरकार व प्रशासन करीत आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राज्यसरकारचे असलेले प्रेम बेगडी असून, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो फक्त आंबेडकरी मतं लाटण्यासाठी केला जातोय, असे मतं आंबेडकरी जनतेचे झाले आहे, त्यामुळे सरकारच्या व प्रशासनाच्या जातीयवादी भूमीकेचा जाहीर निषेध करण्यासाठी, व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम नवीन जागेत तात्काळ सुरु करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सदर आंदोलनास काॅंग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे तालुका अध्यक्ष अविनाश भालेराव, स्वाभीमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिलतात्या धिवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिपक भाऊ निकाळजे गटाचे पुणे जिल्ह्याचे युवक उपाध्यक्ष अमोल साबळे , बहुजन युथ पॅंथरचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष कालीदास उबाळे, भिमरत्न विचारमंचाचे संस्थापक पंढरीनाथ जाधव, बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानोबा वाघमारे, भारतीय बौध्द महासभा पुणे यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असून, ते आंदोलनात सहभागी होणार असून, या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!