सोनोरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :::
सोनोरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड
सोनोरी : सोनोरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील अध्यक्ष दिलीप बळी काळे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवडणूक अधिकारी बागवान मॅडम यांनी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी नूतन अध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सोनोरी गावातील ग्रामस्थ, सोसायटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांमध्ये विद्यमान सरपंच सौ. श्रद्धा काळे, माजी सरपंच बाळूनाना काळे, विलास काळे, भारत मोरे, नितीन काळे, रामदास काळे, सतीश काळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गणेश मोरे, रमेश काळे, प्रकाश काळे, संजय काळे, तेजस कामठे ,पंढरीनाथ माळवकर, अशोक माकर यांच्यासह पुरंदर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा समावेश होता.






