राजकीय

सोमेश्वर वर भगवा फडकवण्याची शिवसेनेची तयारी;आ शिवतारेंनी फुंकले रणशिंग


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
पुरंदरच्या राजकारणात मोठी खळबळ!

सोमेश्वर कारखाना शिवसेना स्वबळावर लढवणार; विजय शिवतारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब!

पुरंदर : पुरंदर-हवेलीच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर आणि ताकदीने लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.

कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदरेश्वरा येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीची दिशा, संघटनात्मक तयारी आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला जिल्हाप्रमुख अतुल मस्के, तालुकाप्रमुख उमेश गायकवाड, उपसभापती प्रवीण जगताप, सहकार समन्वयक महेश जेधे, सोमेश्वरचे माजी व्हा. चेअरमन डॉ. वसंतराव दगडे, तसेच समीर जाधव, माऊली धुमाळ, दत्ता धुमाळ, विजय साळुंखे, सतीश साळुंखे, सुशील चव्हाण, निलेश चिकणे, अरुण कापरे, अरविंद जेधे, करणवाडीचे सरपंच किसन महानवर, स्वागत निगडे, प्रशांत रासकर यांच्यासह बारामती विभागातील राजेंद्र काळे, स्वप्निल जगताप, निलेश मदने, विश्वास मांढरे, बंटी गायकवाड, अविनाश शिंदे, बाळासाहेब कदम, नितीन गायकवाड, अविनाश कदम, राजेंद्र साळुंखे आदी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कारखान्याच्या पारदर्शक कारभारासाठी ही निवडणूक लढवली जाणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्यावर भगवा फडकवण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुरंदर-हवेलीच्या राजकारणात या घोषणेने चांगलीच खळबळ उडाली आहे.


Translate »
error: Content is protected !!