साबळे फार्मसी महाविद्यालय सासवड येथे स्व गोविंदशेठ साबळे यांचा स्मृतिदिन साजरा
साबळे फार्मसी महाविद्यालय सासवड येथे कै. गोविंदशेठ साबळे यांचा स्मृतीदिन साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात कैलासवासी गोविंदशेठ साबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ताण
तणाव व्यवस्थापन या विषयावर मा. श्रीकांत लक्ष्मी शंकर – मेंबर मासूम फौंडेशन यांनी संवाद साधला. ज्या पद्धतीची जीवनशैली आत्ता आपण जगतो हे खूप धकाधकीचं आहे हे सर्वात मोठं तणावाचं कारण आहे असे सरांनी मत मांडलं. हे ताणतणाव भावनांशी कसे जोडले गेले आहेत, तणावाची
वेगवेगळी कारणं काय आहेत आणि त्यावर कौशल्याने कसा उपाय करून तणावमुक्त राहायचं याच मार्गदर्शन सरांनी केले. आपल्याला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःची पूर्णतः ओळख व्हायला हवी आणि त्यानुसार आपण
प्रगती करणे गरजेचं आहे असे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी कै. गोविंदशेठ साबळे यांच्या पुतळ्याचे पूजन करून आदरांजली वाहिली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उप-प्राचार्या डॉ. स्मिता पवार, सौ. विद्या म्हस्के सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दिपाली जगताप, डॉ. प्रज्ञा जगताप, प्रा. शीतल दरेकर यांनी केले.






