कऱ्हा नदीला मे महिन्यातच पूर, जवळार्जुन मध्ये 28 मे अखेर 293 मिलीमीटर पावसाची नोंद
जेजुरी प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे::
कऱ्हा नदीला मे महिन्यातच पूर, जवळार्जुन मध्ये 28 मे अखेर 293 मिलीमीटर पावसाची नोंद
कऱ्हा नदीला मे महिन्यातच पूर नुकत्याच झालेल्या पर्जन्यामुळे पुरंदरच्या पूर्वपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे ओढे नाले पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे कोराळवड्याचे इतरही वड्यांचे पाणी कऱ्हा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले त्यामुळे पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सध्यातरी मिटलेला आहे व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे आता वापसा आल्यानंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग होणार आहे बियाणे उपलब्ध होणे व पावसाने उघडीप देणे ह्या गोष्टी आता फार महत्त्वाचे आहेत निसर्गाने साथ दिली तर यावर्षी संपूर्ण राज्यांमध्येच संपूर्ण तालुक्यामध्येच शेतीसाठी चांगले वातावरण
आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जवळार्जुन मध्ये 28 मे 2025 अखेर 293 मिलिमीटर पावसाची नोंद झाली उसाच्या पिकासाठी या पावसाचा फार फायदा झाला त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंदात आहेत






