ताज्या घडामोडीपुणे

जेजुरी – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेजुरी येथील पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आरपीआयचे पुरंदर अध्यक्ष पंकज धिवार यांनी दिली माहिती


जेजुरी येथील डॉ.आंबेडकर पुतळा उभारणीचे काम प्रगतीपथावर

जेजुरी: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जेजुरी येथील पुतळा, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने काढला. त्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. यामध्ये विशेषतःरिपब्लिकन पक्षाने अतिशय आक्रमक भूमिका घेतली व जवळपास तीन तास पुणे

पंढरपूर पालखी महामार्ग रोखून धरला.या रस्ता रोको मुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.या आंबेडकरी

अनुयायांच्या संतापाचा उद्रेक पाहता, प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सामोपचाराने पुतळ्यासाठी दुसरीकडे जागा

दिली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार, युवानेते गौतम भालेराव,भगवान डिखळे ,दादा

भालेराव,प्रमोद डिखळे ,म्हाळसाकांत भालेराव अशा अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.त्यावेळी

 

प्रशासनाने जुन्या नगरपरिषदेसमोरील अडीज गुंठे जागा देण्याचे मान्य केले व तसे लेखी पत्र दिले.तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी वर्षा

लांडगे,तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत आंबेडकरी कार्यकर्त्यामध्ये झालेल्या बैठकीत मोजणी चे

पैसे भरल्याबाबत व सर्व विभागांचे ना हरकत दाखला तात्काळ मिळण्यासाठी आदेश दिल्याचे सांगितले.दि. 1जुलै

रोजी जेजुरी नगर परिषद येथे आमदार संजय जगताप यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळाउभारणीसाठी ,पुतळा शिल्पकार महेंद्र

थोपटे यांना पुतळा निर्मितीचे काम दिले.त्यावेळी ऍडव्हान्स स्वरूपात रक्कम दिली,15 फुट उंचीचा पुतळा,पाठीमागे भारतीय संविधानाची प्रास्ताविका, अशोक स्तंभ व उर्वरित

जागेत बाग असे बनवण्याचे ठरले.पुतळा ज्या चौथंऱ्यावर उभारायचा आहे त्याचा आकारच संसद भवनाप्रमाने असेल.असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

  • पुतळ्याच्या कामाचा आढावा मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले, यांचेकडे जाऊन पुतळा समिती सदस्यांन
  • घेतला. यावेळी प्रशासनाची सकारात्मक भूमिका व मुख्याधिकारी यांनी सातत्याने सर्व विभागाचे ना हरकत दाखले घेण्यासाठी केलेला पाठपुरावा खूपच वाखाणण्या सारखा आहे.
  • जागेची मोजणी होऊन हद्दी निश्चित झाल्या आहेत. सर्व एन ओ सी जमा झाल्या आहेत.त्यामुळे पुतळा समिती सदस्य व जेजुरी येथील दिखळे -भालेराव यांचेवतीने मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समिती अध्यक्ष गौतम भालेराव यांनी समस्त आंबेडकरी जनतेला या कामाच्या प्रगती विषयी माहीत व्हावी या उद्देशाने प्रसार माध्यमाना माहिती दिली. यावेळी भगवान डिखळे,पंकज धिवार, दादा भालेराव,प्रमोद दिखळे, स्वप्नील भालेराव , म्हाळसाकांत भालेराव, प्रशांत नाझरेकर,पंकज धिवार, राजेश भालेराव, विशाल दिखळे, ओंकार दिखळे, राजेश दिखळे, शशिकांत भालेराव, समाधान भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Translate »
error: Content is protected !!