जेजुरी पोलीस स्टेशन कडून जवळार्जुन येथील विविध चोऱ्यांचा तपास सुरू लवकरच आरोपी पकडणार
सह्याद्री माझा _ पुरंदर प्रतिनिधी नवनाथ राणे
जवळार्जुन मध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच
जवळार्जुन मध्ये एक वर्षापासून घरफोडी मोटर चोरी, ठिबक चोरी ,मोटर केबल चोरी तसेच बंधाऱ्यावरील धापे, धान्य चोरी अशा विविध चोऱ्या झालेल्या आहेत धापे चा तपास सोडला तर बाकी एकाही
चोरीचा तपास जेजुरी पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे जवळार्जुन गावामध्ये ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे. यावर जेजुरी पोलीस स्टेशन कडून योग्य तपास चालू असून लवकरच या चोरांना
पकडले जाईल असे जेजुरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस दीपक वाकचौरे यांनी सांगितले
या आठ दिवसात दररोज 15 ते 20 मोटारींच्या केबल चोरीला जात आहेत. त्याचा पोलीस तपास चालू आहे दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी लक्ष्मण जाधव यांचे घर फोडले सोने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
लोकल क्राइम ब्रांच चे वरिष्ठ अधिकारी व जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी गावात येऊन गेले. जर गावातील कोणाचा काही संशय असेल तर त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनची संपर्क करून माहिती द्यावी त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे ग्रामस्थांना आवाहन केले आहे.
तपास वेगाने सुरू आहे लवकरच चोर सापडतील अशी पोलिसांनी ग्वाही दिली आहे






