पुणे

हिरकणी ग्राम संघाच्या वतीने निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा


सासवड शहरात महिलांच्या संरक्षणासाठी सक्षमपणे मागे उभे रहाणार : ऋषिकेश अधिकारी

सासवड शहर ता.२०: १९ ऑगस्ट रोजी रक्षा बंधन सणानिमित्त हिरकणी ग्रामसंघ गुरोळी व दिवे- गराडे गण व क-हामाई प्रभागसंघ कोडीत यांच्यावतीने सासवड पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.

यावेळी सासवड शहरात महिलांच्या संरक्षणासाठी सक्षमपणे आपण त्यांच्या मागे उभे राहून त्यांना आधार देणारं काम करु असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. दिवे-गराडे गणाच्या ग्रामसंघाच्या अध्यक्षा अलका बडदे, सचिव हेमलता खेडेकर, हिरकणी ग्राम संघाच्या

अध्यक्षा छाया खेडेकर आदी उपस्थित होत्या. फोटो : सासवड (ता.पुरंदर) येथे पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना राखी बांधताना छाया खेडेकर बाजूस इतर.


Translate »
error: Content is protected !!